नखांवरचं घासून घासून
जेम–तेम राहिलेलं
नेल पॉलिश काढायला
कापूस सापडेना
म्हणून देव्हाऱ्याच्या खालच्या खणात
ठेवलेल्या
न फोडलेल्या प्लास्टिक च्या पाकिटातून
दोन वाती काढल्या
बोटावरच्या पुसट रंगाबरोबर
उरली सुरली श्रद्धा देखील
सहज मिटून गेली.
–सई कोरान्ने–खांडेकर
Comments (0)