11Jan2018 Saved in: POETRY, Writing by admin with 0 Comments पोळी लाटत लाटत ओळी आल्या नकळत दीस शोधिले एकांत पान माझे पांढरे. घर भरले फिरुनी कोलाहल माझ्या कानी लेकी पोरांची ग वाणी हेचि माझे गाणे! पान बोलावे फितूर झाले मन चिंतातूर गेले शब्द कसे दूर निरंकुश! सई कोरान्ने–खांडेकर Share on: Twitter Pinterest Facebook Google+
Comments (0)